image-call
image-whatsapp

श्री सदगुरु धोंडीराज निवासी अंध विद्यालय, पलूस Blind Residential School in palus

श्री सदगुरु धोंडीराज निवासी अंध विद्यालय, पलूस ही एक नामांकित विशेष शिक्षण संस्था असून तिची स्थापना सन 2006 मध्ये करण्यात आली आहे. या संस्थेस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच समाज कल्याण विभाग, सांगली यांची अधिकृत मान्यता प्राप्त आहे.

ही शाळा अनुदान तत्त्वावर कार्यरत असून अंध विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट अंध विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या कला, कौशल्य व सुप्त गुणांना वाव देणे हे आहे.

आमच्या शाळेत विद्यार्थ्यांची सर्वांगीण शैक्षणिक प्रगती घडवून आणली जाते. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊन नोकरीच्या संधींसाठी सक्षम केले जाते. समाजात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे, स्वावलंबनाची भावना निर्माण करणे तसेच उदरनिर्वाहासाठी आवश्यक कौशल्यांना प्रोत्साहन देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

पुढे वाचा
about-us

शाळेत दिल्या जाणाऱ्या सोयी व सुविधा

  • सुसज्ज व सुरक्षित इमारत.

  • ब्रेल लिपी प्रशिक्षित शिक्षक.

  • विद्यार्थी शिक्षक प्रमाण 10:1.

  • मुलांना गायन वादन प्रशिक्षक.

  • मुलांची काळजी घेण्यासाठी काळजीवाहक

  • मोबेलिटी प्रशिक्षक.

  • पोषक, स्वच्छ आणि संतुलित आहार.

  • सीसीटीव्ही व वायफाय सुविधा.

  • मुला मुलींना स्वतंत्र वसतिगृह.

  • मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण व खेळायचे साहित्य उपलब्ध आहे

  • शीघ्र हस्तक्षेप वर्ग.

  • हस्तकला प्रशिक्षण, योगासन ,प्राणायाम मार्गदर्शन.

  • आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय.

  • मुलांच्या औषध उपचारासाठी नर्स.

  • मुला मुलींसाठी स्वतंत्र संडास, बाथरूमची सोय

आम्हाला का निवडाल ?

शाळेत शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य तपासणी, व्यावसायिक प्रशिक्षण आणि विविध उपक्रम पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार तज्ञांकडून तपासणी केली जाते आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते.

शाळेत सुरक्षित, स्वच्छ आणि निगा राखलेली निवासी व्यवस्था उपलब्ध आहे, ज्यामध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते.

भाषा, गणित, स्वावलंबन, दैनंदिन कौशल्ये, वर्तन विकास, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम तसेच व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

होय, विद्यार्थ्यांचे नियमित आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाते आणि आवश्यकतेनुसार उपचार व मार्गदर्शन दिले जाते.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालकांना नियमित माहिती दिली जाते तसेच पालक-शिक्षक बैठकीद्वारे त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते.
  • विनामूल्य शिक्षण, निवास व भोजन.
  • वैयक्तिक क्षमतेनुसार विशेष शिक्षण.
  • सुरक्षित व स्वच्छ निवासी व्यवस्था.
  • नियमित वैद्यकीय तपासणी.
  • सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची सुविधा.

शालेय उपक्रम

envent
दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा- 2025 सांगली जिल्हा
envent
शाळेमध्ये पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यात आली
envent
विद्यार्थ्यांसाठी दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
envent
विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
envent
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांसह सहभाग
envent
3 डिसेंबर दिव्यांग दिन साजरा करत असताना विद्यार्थी
envent
रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला
envent
आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी काढण्यात आली.

आमच्याशी संपर्क करा

श्री सदगुरु धोंडीराज निवासी अंध विद्यालय, पलूस

गाव तळाच्या पूर्वेला , प्रथमेश हाईटच्या बॅक साईटला , पलूस तासगाव रोड, पलूस

आम्हाला कॉल करा

+91 8108546013

आम्हाला मेल करा

sdn2006palus@gmail.com

घरभेट मार्गदर्शन फॉर्म

आपल्या पाल्यासाठी घरी येऊन माहिती सांगण्यासाठी फॉर्म भरून द्या. लवकरच आमचे शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी घरी येतील.